सामान्य व्याख्या: लैंगिक प्रवृत्ती, लैंगिक ओळख आणि अभिव्यक्ती
लैंगिक प्रवृत्ती (Sexual Orientation)
व्यक्तीचे लैंगिक आकर्षण व्यक्त करते. काही लोक एखाद्या विशिष्ट लिंगाच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात; इतर एकापेक्षा जास्त लिंगांकडे आकर्षित होतात. काही जण कोणाकडे ही आकर्षित होत नाहीत.
असेक्शुअल (Asexual) – लैंगिकदृष्ट्या कोणाकडे ही आकर्षित होत नाहीत/ किंवा कोणालाही आकर्षित करण्याची इच्छा नाही. अशी लोकं सेक्सलेस असतात असा नाही. असेक्शुअल लोक काही वेळा प्रेमळ (रोमाँटिक) आकर्षण अनुभवतात.
उभयलिंगी (Bisexual) – स्वतःचे लिंग आणि इतर लिंगांच्या लोकांना आकर्षित होतात. दोन सामान्य गैरसमज म्हणजे उभयलिंगी लोक कोणालाही आकर्षित होतात किंवा त्यांचा “निर्णय झालेला नसतो. बहुतेकदा “बाय.” असेही म्हणतात.
गे (Gay) – सामान्यतः पुरुषांकडे आकर्षित होणारे पुरुष. स्वतःच्या लिंगाच्या लोकांकडे आकर्षित होणाऱ्या लोकांसाठी वापरले जाते. काही वेळा “समलैंगिक” देखील ह्यासाठी वापरली जातात, जरी ही संज्ञा आजच्या बर्याच लोकांद्वारे एक वैद्यकीय संज्ञा म्हणून पाहिली जाते जी सामान्य वापरापासून निवृत्त झाली पाहिजे.
लेस्बियन (Lesbian) – स्त्रियांकडे आकर्षित होणारी स्त्री. कधीकधी किंवा पर्यायीपणे “सेम जेंडर लविंग वुमन” किंवा “वुमन लविंग वुमन” असेही म्हटले जाते.
पॅनसेक्सुअल/फ्लुइड (Pansexual/Fluid) – लिंगा व्यतिरिक्त आकर्षित होणारी लोकं! कधीकधी किंवा पर्यायीपणे ओम्नीसेक्सुअल किंवा पाॅलीसेक्सुअल म्हणूनही संबोधिले जाते. उभयलिंगी आणि क्वीयर बघा.
क्वेशनिंग (Questioning) – जी व्यक्ती अनिश्चित, पुनर्विचार, किंवा त्यांची लैंगिक ओळख किंवा लिंग अभिव्यक्ती किंवा ओळख ओळखणे बंद ठेवण्याचा पर्याय निवडतो.
क्वीयर (Queer) – परंपरेने एक अपमानजनक संज्ञा आहे, परंतु काही एलजीबीटीक्यू व्यक्तींनी स्वत: ची ओळख दर्शविण्याकरिता शब्दावर हक्क सांगितला आणि विनियोग केला आहे. ही एक व्यापक संकल्पना आहे ज्यामध्ये लैंगिक प्राधान्ये, लैंगिक अभिव्यक्ती आणि सवयींचा समावेश आहे जे विषमलिंगी, उत्थानिक, किंवा लिंग–बायनरी बहुसंख्याकांमध्ये नसते. ही संज्ञा एलजीबीटी समुदायाच्या सर्व सदस्यांनी सार्वत्रिकपणे स्वीकारलेले शब्द नाही, आणि विषमलिंगीद्वारे वापरली सहसा आक्षेपार्ह मानली जाते.
स्ट्रेट (Straight) – “विरूध्द” लिंगाच्या लोकांकडे आकर्षित होणारी लोकं! (खाली पहा); काहीवेळा सामान्यतः ज्या लोकांची लैंगिकता सामाजिक रूढीवादी असते त्यांच्या संदर्भात वापरली जाते. वैकल्पिकरित्या “विषमलिंगी” म्हणून संदर्भित केले जाते.
लिंग ओळख आणि अभिव्यक्ती (Gender Identity and Expression)
ज्याप्रकारे व्यक्तींची लैंगिकता, अभिव्यक्ती आणि लिंग भूमिकांचे स्वरूप यांसह ओळखली जाते किंवा व्यक्त केली जाते. एखाद्याचे लिंग (उदा. नर, मादा, इन्टरसेक्स, इ.) सहसा भौतिक जीवशास्त्रानुसाल जन्मतः नेमले जाते. एखाद्याची लैंगिकता (उदा. स्त्री, पुरूष, जेंडरक्वीयर , इत्यादी) स्वतःच्या स्वभावाच्या आतील अर्थ आणि ओळख यांवर आधारित आहे. एखाद्याची लिंग अभिव्यक्ती (उदा. मर्दानी, स्त्रीलिंगी, अॅन्ड्रोजिनस, इत्यादी), लिंग गुणधर्म, सादरीकरणे, भूमिका आणि अधिक यांवर अवलंबून आहे.
अॅन्ड्रोजिनी (Androgyny) – मर्दानी आणि स्त्रीलिंगी लैंगिक अभिव्यक्तीचे एकत्रिकरण किंवा लैंगिक ओळखीचा अभाव. अॅन्ड्रोजिन, एजेंडर आणि न्यूट्रोआ या संज्ञांचा वापर कधीकधी जेंडरलेस, नाॅन–जेंडर, बियाॅन्ड किंवा बिट्विन जेंडर तर कधी दोघांचे मिलन करणारे व्यक्ती करतात.
सिस–जेंडर (Cis-Gender) – अशी लैंगिक अभिव्यक्ती जे समाज शारिरीक लिंगाच्या अनुरूप समजते. सिस चा अर्थ ‘या बाजूला‘ अथवा ‘यांमधून नाही‘ असा होतो. संज्ञेचा वापर तृतीयपंथी नसलेल्या लोकांसाठी केला जातो.
क्राॅसड्रेसर (Crossdresser) – क्राॅसड्रेसिंग म्हणजे विशिष्ट अथवा ठराविक वेळी विरूध्द लिंगाचे कपडे घालणे. जी लोकं याला त्यांच्या अभिव्यक्तीचा भाग समजतात ते स्वतःला क्राॅसड्रेसर म्हणून संबोधित करतात. (टिपः क्राॅसड्रेसर संज्ञेचा वापर ट्रान्ससेक्सुअल व्यक्तीला संबोधण्यासाठी करू नयेत.)
जेंडर क्वीयर/ तृतीयपंथी/ जेंडर फ्लुइड (Gender Queer/Third Gender/Gender Fluid) – ह्या संज्ञा स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी च्यामध्ये किंवा त्याव्यतिरिक्त असणाऱ्या लोकांसाठी वापरले जाते. त्यांना कदाचित दोन्ही लिंगांपैकी कुठलेच नाही अथवा दोघांचे थोडे फार किंवा त्यांच्या जेंडर लेबलस् च्या बंधनात राहिल्या सारखे वाटते.
इंटरसेक्स (Intersex) – विविध जनुकीय, संप्रेरक किंवा रचनात्मक स्थितीमध्ये वापरल्या जाणारी संज्ञा, सामान्य शब्दात ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची पुनरुत्पादक किंवा लैंगिक अवयवे जन्मतः स्त्री किंवा पुरुषांच्या विशिष्ट व्याख्येत बसत नाहीत. काही इंटरसेक्स स्वतःला तृतीयपंथी किंवा जेंडर वेरियंट म्हणून व्यक्त करतात तर काही नाही करत. (टिप: हर्माफ्रोडाईट ही संज्ञा असून सद्य स्थितीत योग्य मानली जात नाही.)
ट्रान्ससेक्सुअल (Transsexual) – ऐतिहासिकदृष्ट्या ट्रान्ससेक्सुअल ही संज्ञा वैद्यकीय आणि कायद्यान्वये ज्या व्यक्तिंनी लिंगबदल सर्जरी केलेल्या किंवा करण्याची ईच्छा असलेल्या व्यक्तिंना संबोधण्यासाठी वापरली जाते. अनेक ट्रान्ससेक्सुअल व्यक्तिंच्या मनात त्यांचे जन्मः लिंग आणि लैंगिक ओळखीबद्दल मतभेद अथवा संभ्रम असतात. या व्यक्तिंना पुरूष ते स्त्री (मेल टू फिमेल) अथवा ट्रान्स वुमन आणि स्त्री ते पुरूष (फिमेल टू मेल) अथवा ट्रान्समेल असेही संबोधिले जाते.
टू– स्पिरीट (Two Spirit) – अशी व्यक्ती जी काही व्यक्तिंमध्ये स्त्री आणि पुरूष अश्या दोन्ही आत्म्यांचा सहवास असण्याच्या पारंपारिक अमेरिकी परंपरेला मानते.
इतर काही सामान्य संज्ञा (Other Commonly Used Terms)
बायफोबिया (Biphobia) – लोकं एकापेक्षा अधिक लिंगांच्या व्यक्तिंकडे आकर्षित होऊ शकतात या संकल्पनेच्या तिटकाऱ्यामुळे आणि प्रेजुडीसमुळे होतो सामान्यतः उभयलिंगीपणाशी निगडित वाईट गैरसमज आणि उभयलिंगी लोकांची अदृश्यता यांवर आधारित असते.
कमिंग आऊट (Coming Out) – स्वतःच्या लैंगिक ओळख अथवा अभिव्यक्तीची स्वतः किंवा इतरांना जाणीव करुन देण्याच्या प्रक्रियेला कमिंग आऊट असे म्हणतात.
जेंडर बायनरी (Gender Binary) – लिंग आणि लैंगिकतेला स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी या दोन वेगळ्या आणि विभक्त संस्थेमध्ये विभागणे. हे एकाप्रकारचे सामाजिक बंधन किंवा सामाजिक मर्यादा म्हणून संदर्भित केले जाऊ शकते जे लोकांना लिंग भूमिका पार करण्यापासून किंवा एकत्रित करण्यापासून किंवा इतर तिसर्या (किंवा अधिक) लिंग अभिव्यक्तींची निर्मीती करण्यापासून परावृत्त करते. हे इंटरसेक्स आणि तृतीयपंथी लोकांसोबत जोडलेल्या प्रेजुडिसेस अथवा गैरसमजांना पण निर्देशित करू शकते.
हेटेरोसेक्सिझम (Heterosexism) – एकाप्रकारचा मानसिक ग्रह की सगळी लोकं विषमलिंगी असतात किवां विषमलैंगिकता हिच सर्वश्रेष्ठ लैंगिक भूमिका आहे. अनेकदा या विश्वासाला मजबुत करण्यासाठी आणि आपल्या समाजातील विषमलिंगी लोकांच्या विशेषाधिकारांची जाणीव करण्यासाठी बहुसंख्य (विषमलिंगी) शक्तीचा वापर करणे समाविष्ट आहे.
होमोफोबिया (Homophobia) – गैर–विषमलिंगी लैंगिकता असलेल्या लोकांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन आणि भावना असणे; विषमलिंगी मानदंडांशी सुसंगत नसलेल्या लैंगिकतेला नापसंत करणे किंवा त्यामुळे अस्वस्थ होणे.
अंतर्गत दडपशाही (Internalised Oppression) – एलजीबीटीक्यू लोकांच्या संदर्भात, अंतर्गत दडपशाही ही अशी समजूत आहे की एलजीबीटीक्यू लोकांच्या तुलनेत विषमलिंगी आणि बिगर ट्रान्सजेन्डर लोकं “सामान्य” किंवा त्यांपेक्षा जास्त चांगले आहेत आणि त्याचबरोबर एलजीबीटीक्यू लोकांबद्दलचे नकारात्मक रूढीवादी विश्वास अथवा समज योग्य आहेत.
एलजीबीटीक्यू (LGBTQ) – लेस्बियन, गे, बायसेक्सुअल, ट्रांन्सजेंडर आणि क्वीयर यांसाठी एक परिवर्णी शब्द आहे. अमेरिकेत हे सध्या सर्वाधिक लोकप्रिय मार्गांपैकी एक आहे जे लैंगिक प्रवृत्ती आणि/किंवा लिंग ओळखांमुळे किरकोळ ठरलेल्या सर्व लोकांना संबोधित करण्यासाठी वापरले जाते, इतर अक्षरेपण सहसा वर वर्णन केलेली ओळखींचे प्रतिनिधित्व करण्यासाठी समाविष्ट केली जातात.
ट्रान्सफोबिया (Transphobia) – ट्रान्सजेंडर लोकांबद्दल नकारात्मक भावना आणि विचार किंवा ज्यांची लिंग ओळख आणि/किंवा लिंग अभिव्यक्ती पारंपारिक किंवा रूढीवादी लिंग भूमिकांशी जुळत नाहीत.
एलजीबीटीक्यूआयएबद्दल इंग्रजीमधून अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा: