‘आउट एण्ड लाउड’ च्या नावाने मागील वर्षी पुण्यात क्वीयर फ़िल्म फेस्टिवल चे आयोजन केले गेले होते. नावाप्रमाणेच या फिल्म फेस्टिवलने स्वतःची आउट आणि लाउड छाप लोकांवर सोडली. मागील वर्षी ३ दिवसांच्या या फिल्म फेस्टिवलमध्ये एकूण ४८ चित्रपट दाखवले गेले तसेच दर दिवशी चित्रपट निर्मात्यांसोबत चर्चासत्रे पण आयोजित केली होती. या चर्चासत्रांच्या माध्यमातून निर्मात्यांनी त्यांचे अनुभव प्रेक्षकांसमोर मांडले आणि प्रेक्षकांसोबत संवाद साधला. या तीन दिवस चाललेल्या फिल्म फेस्टिवलने पुणे शहरात में खळबळ मचवली. एका शांत आणि पुरातन सभ्यतेने जकडलेल्या शहरात जणू एक नवा आवाज उठल्यासारखे!

या वर्षी हे फिल्म फेस्टिवल ६,७ आणि ८ एप्रिल २०१८ ला मोनालिसा कलाग्राम, कोरेगाव पार्क येथे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. हे फेस्टिवल एकूण ३ दिवस चालणार असून यामध्ये १२८ चित्रपट दाखवले जाणार आहेत. या वर्षी आयोजकांकडे १०३ देशांमधून १६१५ चित्रपट आले होते. या तीन दिवसांच्या फेस्टिवल मध्ये चित्रपटांशिवाय निर्मात्यांसोबत चर्चा, नृत्य, गायन आणि आणखी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून फिल्म फेस्टिवल फक्त मेट्रो सिटींपर्य॔त मर्यादित न राहता आपला विस्तार वाढवत आहे. अश्याप्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम समाजाच्या विचारसरणीत परिवर्तन करण्यासाठी प्रमुख भुमिका पार पाडत आहेत.
फिल्म फेस्टिवलच्या अधिक माहितीसाठी वेबसाइटला अवश्य भेट द्या.

 

Share this

One thought on “१२८ चित्रपट थोडे निराळे, थोडे वेगळे तरीही आपल्यातलेच!”

  1. I think this is among the most important information for me.
    And I’m glad to read your article. But wanna remark on few general things, The site style is wonderful, the articles are really great: D. Good job, cheers

Leave a Reply

Your email address will not be published.