कशीश मुंबई आंतरराष्ट्रीय क्वीयर फिल्म फेस्टिवल – दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या एलजीबीटीक्यू फिल्म फेस्टिवलची ९ वी आवृत्ती ४५ देशांमधून १४० चित्रपट प्रदर्शित करणार आहे. या वर्षी भारत हा ‘कंट्री इन फोकस‘ असेल कारण फेस्टिवल दरम्यान ३३ भारतीय एलजीबीटीक्यू संकल्पनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित केले जातील, जे २३ मे – २७ मे च्या दरम्यान दक्षिण मुंबईतील दोन चित्रपटगृहांत – लिबर्टी कार्निवल सिनेमाज् आणि मेट्रो आयनॉक्स मध्ये आयोजित केले जाणार आहेत. या वर्षीची थीम “अभिमानाने एकत्रित” (Together with Pride) आहे.
श्रीधर रंगायन यांच्यामते, “कशीशमधील एकूण १४० चित्रपटांच्या प्रदर्शनांमध्ये, २५ टक्के लक्ष भारतीय चित्रपटांवर केंद्रित आहे. त्यापैंकी अनेक चित्रपटांटे जागतिक किंवा भारतीय प्रेमिअरस् आहेत. भारतीय LGBTQ विषयांवर आधारित चित्रपट सिनेमॅटीक सीमा फक्त मुद्दे आणि कथानक नव्हेच तर वर्णनात्मक आणि तांत्रिकरित्या ही पार करत आहेत. महाविद्यालयातील चिडवण्याचे प्रकार, स्वयम, कौटुंबिक आणि सहकार्यांसमोर स्वतःची जाणीव, साथीदाराचा शोध, कौंटुबिक स्वीकार, अश्या विविध मानवी भावनांवर आधारित हे चित्रपट आहेत. आनंदाची बाब ही आहे, की चित्रपटांचे दिग्दर्शक विविध पैलूंनी आणि अतिशय संवेदनशीलपण विषयाची हाताळणी करत आहेत.”
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओनिर जे कशीश चे ज्युरी सदस्यपण होते त्यांनी कशीश हे कसे स्वतंत्र चित्रपट निर्मितीच्या विकासाचे एक उत्तम माध्यम आहे, विशेषतः LGBTQ विषयांवर आधारित चित्रपटांकरिता यावर मतं व्यक्त केले. ओनिर यांचा नवा चित्रपट “शब” हा कशीश २०१८ मधील एक बिग तिकेट चित्रपट असणार आहे आणि या चित्रपटातील समलैंगिक संबंधाचे नाॅन–स्टेरिओटिपिकल चित्रण कशीशच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल अशी त्यांना आशा आहे.”
प्रसिध्द रेडिओ संवादक रोहिणी रामनाथन, ज्यांनी कशिशच्या विविध आवृत्तींचे निवेदन केले आहे त्यांच्यामते ” कशीश हे फक्त LGBTQ चित्रपट प्रदर्शनाचे माध्यम नसून ते दरवर्षी LGBTQ समाजातील विविध लोकांसाठी आपले कौशल्य गाणी, विनोदी कथानक आणि एका पेक्षा एक नृत्य अशा विविध कलांचे प्रदर्शन करण्याचे पण माध्यम आहे. “कशीश हा सर्जनशीलतेचा सोहळा आहे.”
कशीश मुंबई आंतरराष्ट्रीय क्वियर फिल्म फेस्टिवल २०१८ मध्ये रोख रुपये २.६५ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. जी दक्षिण आशिया भागातील LGBTQ चित्रपट महोत्सवासाठी सर्वाधिक रक्कम आहे. चित्रपट आठ विभागांत स्पर्धा करतील. “यावर्षीच्या सर्व पुरस्कार प्रायोजकांनी कौशल्याची जाणीव होण्यासाठी वाढवलेल्या रुपये २.६५ लाख पुरस्कार निधीकरिता मनःपूर्वक आभार. आता फक्त उत्तम चित्रपटाने बाजी मारावी, असे मत फेस्टिवलचे दिग्दर्शक श्रीधर रंगायन यांनी व्यक्त केले.” पुरस्कार जाहीर आणि वितरण सोहळा अखेरच्या दिवशी २७ मे २०१८ रोजी लिबर्टी कार्निवल सिनेमाज् येथे संपन्न होईल.
प्रोग्रामिंग संचालक सागर गुप्ता म्हणाले, “दरवर्षी कशीशमध्ये Country in Focus असते, ज्यामधून आम्ही एका देशातील विविध दिग्दर्शकांनी LGBTQ विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित करतो. या वर्षी भारतामध्ये बनवलेल्या विलक्षण चित्रपटांची संख्या पाहून आम्हाला वाटले की, भारताला Country in Focus म्हणून नाव देणे सर्वात योग्य ठरेल.”
आॅनलाईन नावनोंदणी खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे:
https://in.bookmyshow.com/events/kashish-2018/ET00073838
थोडे कशीश मुंबई आंतरराष्ट्रीय क्वीयर फिल्म फेस्टिवलबद्दल
जगभरातील उत्कृष्ठ ५ एलजीबीटी फिल्म महोत्सवांपैकी एक म्हणून मत दिलेले, कशीश मुंबई इंटरनॅशनल क्वीयर फिल्म फेस्टिवल हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे आणि भारतातील एकमेव एलजीबीटी चित्रपट महोत्सव आहे जो मुख्य प्रवाहात रंगभूमीवर आयोजित केला जातो. २०१० मध्ये स्थापित, कशीशचे पाच दिवस तीन ठिकाणी आयोजन केले जाते. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाची मंजुरी घेऊन आयोजित केलेला हा पहिला भारतीय एलजीबीटीचा महोत्सव आहे. कशीश मुंबई आंतरराष्ट्रीय क्वियर फिल्म फेस्टिव्हल कशीश आर्ट्स फाऊंडेशन द्वारा सादर आणि सोलारिस पिक्चर्स द्वारा आयोजित केले आहे. या वार्षिक चित्रपट महोत्सवाव्यतिरिक्त कशीश फाॅरवर्ड – भारतातील प्रथम ट्रॅवेलिंग कँपस LGBTQ फिल्म फेस्टिवल, कशीश ग्लोबल जे जगभरात भारतीय LGBTQ चित्रपटांचे प्रदर्शन करते, बेस्ट आॅफ कशीश चित्रपटांचे प्रदर्शन आणि कशीश चलचित्र उत्सव जो प्रादेशिक भाषांमधील LGBTQ चित्रपटांचा महोत्सव आहे.
कशीश २०१८ फेस्टिवल थीम
कशीश मुंबई इंटरनॅशनल क्वीयर फिल्म फेस्टिवलची ९ वी आवृत्ती अभिमान आणि कुटुंब, समाज, लिंग, लिंग, वांशिकता आणि शरीराच्या प्रकारांची असीम विविधता साजरी करेल. समान हक्क आणि सामाजिक स्वीकृतीसाठीचा लढा हा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविरूद्ध लढा आहे आणि जेव्हा आपण सर्व – LGBTIQ आणि सहयोगी – स्वतःला साजरे करण्यास अभिमानाने एकत्र येऊ तेव्हाच समान अधिकार प्राप्त होऊ शकतात.