The 11th edition of the Queer Azadi Mumbai Pride March, 2019 took place at August Kranti Maidan on February 02, 2019.

This was the 1st Pride after the historic verdict of the decriminalisation of section 377 by the Supreme Court of India.  It witnessed huge support from student groups, institutions, student-political movements, corporates, and the media and addressed issues of homophobia, transphobia, discrimination against LBT groups and trans individuals and voicing against institutions perpetuating systemic oppression on the basis of caste and class.

The 11th Pride edition ended on a positive note that the visibility and awareness about the LGBTQIA+ community is increasing day by day and if we all work together then we might end up creating a safe and all inclusive environment for all.

Here are some of the Mumbai Pride 2019 pictures:

Picture Credits: Shraddha Gajanan.


क्वीअर आझादि मुंबई एलजीबीटी प्राईड, २०१९

मुंबई एलजीबीटी अभिमान मोर्चा, २०१९ दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारी म्हणजे २ फेब्रुवारी, २०१९ रोजी दुपारी ३ वा. ते ५ वा. या वेळेत पार पडला. हा मोर्चा नेहमीप्रमाणे दुपारी ४ वा. ऑगस्ट क्रांती मैदानापासून सुरू झाला. त्याआधी दुपारी ३ वा. ते ४ वा. च्या दरम्यान काही एलजीबीटी व्यक्ती, एलजीबीटी समर्थक, एलजीबीटी व्यक्तींचे पालक, टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीचे भाषणं झाली आणि घोषणा देण्यात आल्या.

यावर्षीची प्राईड ऐतिहासिक होती. त्याला कारण होते ते म्हणजे कलम ३७७ चा निकाल. या कलमाप्रमाणे पूर्वी समलिंगी संबंध मग ते प्रौढ व्यक्तींमध्ये असो किंवा खाजगी मध्ये केलेले असोत ते गुन्हा ठरवत होते; तर त्या कलममध्ये बदल करून समलिंगी संबंधांना भारतात मान्यता दिली. या निकालानंतरची ही मुंबई ची पहिली प्राईड होती. त्यामुळे मुंबई प्राईड चा दिवस सर्व एलजीबीटी व्यक्ती आणि एलजीबीटी समर्थकांसाठी अभिमानाचा आणि आनंद साजरी करण्याचा दिवस होता. त्यासाठी दिल्ली, पुणे, कोलकाता, बंगळुरू अशा मोठ्या शहरांतून तसेच अगदी छोट्या खेड्यांतील एलजीबीटी व्यक्तींनी आणि समर्थकांनी हजेरी लावली होती. यामध्ये अनेक भिन्नलिंगी व्यक्ती, टीव्ही / चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती, महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक, खाजगी कंपन्यांचे कर्मचारी, एलजीबीटी व्यक्तीचे पालक, तसेच अनेक संस्था जसे मुंबईतील कशीश फिल्म फेस्टिव्हल, पुण्यातील समपथीक ट्रस्ट, नागपूर मधून सारथी ट्रस्ट, मुंबईतील हमसफर ट्रस्ट, गोदरेज कंपनी, केशव सूरी फाउंडेशन तर अनेक ग्रुप जसे The QKnit, रेनबो टायगर्स, स्वीकार (एलजीबीटी व्यक्तीच्या पालकांचा ग्रुप) यारिया, गेसी फॅमिली, गे बॉम्बे, उमंग अशा अनेक प्रतिनिधींनी हजेरी लावली.
यावर्षीच्या प्राईड मध्ये २०,००० व्यक्तींनी उपस्थित लावली असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या सर्वांनी त्यांच्या कंपनीचे, संस्था किंवा ग्रुप चे टी शर्ट घालून किंवा बॅनर हातात पकडून प्राईड मध्ये आपले नेतृत्व केले.

हमसफर ट्रस्ट चे काही कर्मचारी तसेच इतर संस्था, कॉलेज चे विद्यार्थी इत्यादी स्वयंसेवकांनी मोर्चा साठी आलेल्या लोकांना रस्त्याचे मार्गदर्शन, ट्राफिक नियंत्रण इत्यादी कामे केली. दरवर्षीप्रमाणे ढोल ताशा पथकांना बोलावले होते. “I am Gay, That’s Ok”, “He He Ho Ho Homophobia Has To Go”, “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं” इत्यादी घोषणा दिल्या. सध्या भारतात फक्त समलिंगी संबंधांना मान्यता दिली आहे परंतु समलिंगी विवाह आणि समलिंगी व्यक्तींना मूल दत्तक घेण्यास मान्यता नाही. या प्राईडमध्ये या घोषणातून लढाई अजून बाकी आहे, ही तर यशाची पहिली पायरी आहे ; तसेच इतर हक्क मिळवण्यासाठी ची लढाई लढण्याची प्रेरणा देण्यात आली. ज्याप्रमाणे आम्ही आमची लैंगिकता स्वीकार केली, काही एलजीबीटी व्यक्तीच्या पालकांनी त्यांच्या मुलांचा स्वीकार केला तसा समाजाने स्वीकारावे, शिक्षण, नोकरीमध्ये समान हक्क मिळवण्याची, कोणाच्याही दबावाखाली न जगता अभिमानाने समाजात वावरण्याचा आम्हाला पूर्ण हक्क आहे यांसारखे संदेश या प्राईड मधून देण्यात आले.

प्राईड साठी आलेल्या काही एलजीबीटी व्यक्तीच्या तोंडावर मास्क होते तर काही लोकं प्राईडपासून लांब फुटपाथवर उभे राहून प्राईडचा आनंद घेत होते. अनेकांनी वेगवेगळ्या वेशभूषा आणि रंगभूषा केल्या होत्या. ढोल ताशांच्या तालावर नाचून काहींनी आपला आनंद साजरा केला. प्राईड सुरू झाल्यानंतर काही मिनिटांच्या अंतरावर एका घरातील दोन वृद्ध व्यक्तींनी प्राईडमधील लोकांना अंगठा दाखवून शुभेच्छा देत सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्वानी त्यांचे मनापासून आभार मानले. तसेच रस्त्यांवरून ये जा करणाऱ्या काहींनी पण सकारत्मक प्रतिसाद दिला.

अशा प्रकारे पोलिसांच्या बंदोबस्तात आणि काही स्वयंसेवकांच्या मदतीने प्राईड मोठ्या जल्लोषात साजरी झाली.

Share this

One thought on “Mumbai Pride 2019: A Glance”

  1. I’m curious to find out what blog platform you’re working with?
    I’m having some minor security issues with my latest site and I’d like to find something safer. Do you have any suggestions?

Leave a Reply

Your email address will not be published.