दक्षिण आशियामधील सर्वांत मोठ्या LGBTQ चित्रपट महोत्सवात 45 देशांतील 140 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

फ्रेंच चित्रपटबीटस् पर मिनिटआणि भारतीय चित्रपटइवनिंग शॅडोदोन्ही पुरस्कार विजेते चित्रपट 9 व्या कशीश मुंबई आंतरराष्ट्रीय क्वीयर फिल्म फेस्टिवलचे शुभारंभ आणि समारोपाचे चित्रपट असतील. दक्षिण आशियामधील सर्वांत मोठा LGBTQ चित्रपट महोत्सव 23-27 मे, 2018 पासून मुंबईतील दोन प्रसिध्द चित्रपट गृहे म्हणजेच लिबर्टी कार्निवल सिनेमा आणि मेट्रो आयनाॅक्स येथे आयोजित केला आहे. LGBTQ चित्रपट महोत्सवात 45 देशांतील 140 चित्रपट प्रदर्शित केले जाणार असून त्यामध्ये 33 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. या वर्षीची महोत्सवाची थीमअभिमानाने एकत्रित” (Together with Pride) आहे.

शुभारंभ आणि समारोपाचे चित्रपट महोत्सवाची थीमअभिमानाने एकत्रित” (Together with Pride) व्यक्त करतात. एकीकडे शुभारंभाचा चित्रपटबीटस् पर मिनिटएडस् सारख्या भयानक रोगाविरूद्ध एकमताने एकत्रित आलेल्या लोकांची कथा दर्शवतो, तर समारोपाचा चित्रपटइवनिंग शॅडोस्वतःच्या मुलांना साथ देण्यासाठी कुटुंबाने एकत्रित येणे गरजेचे आहे यावर भाष्य करतो. श्रीधर रंगायन यांच्यामते, “दोन्ही चित्रपट अभिमानानेच आपण आपला सन्मान मिळवू शकतो हा विचार व्यक्त करतात.

ख्यातनाम दिग्दर्शक राॅबिन कॅपिलो लिखित आणि दिग्दर्शक चित्रपटबीटस् पर मिनिटसुरवातीच्या काळातील मिलिटंस् एडस् अॅक्टिविस्ट ग्रूप अॅक्ट अप पॅरिस याचे नाट्यरूपांतरण करतो. चित्रपटाने ८००,००० तिकीटे विकून फ्रेंच बाॅक्स आॅफिसवर जबरदस्त छाप सोडली पण कॅपिलो जे स्वतः गे आणि अॅक्ट अप मोहिमेचा भाग असल्याने म्हणाले कीअत्याधिक संतुष्टता या गोष्टीची आहे की चित्रपटामुळे लोकं अॅक्ट अप आणि एडस् बद्दल बोलू लागले.

या चित्रपटाचा जागतिक प्रेमिअर कान्स् चित्रपट महोत्सवात झाला आणि तिथे चित्रपटाने ग्रँड प्रीक्स् सन्मान मिळवला. त्यानंतरबीटस् पर मिनिटने सहा सिसार पुरस्कार, उत्कृष्ठ चित्रपटासोबत भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल गोवा २०१७ मध्येपण उत्कृष्ठ चित्रपटाचा सन्मान मिळवला. ‘इवनिंग शॅडोचित्रपटाचा जागतिक प्रेमिअर फेब्रुवारी २०१८ मध्ये सिडनी मधील मारदिग्रास फिल्म फेस्टिवल मध्ये झाला आणि चित्रपटाचे प्रदर्शन बंगलोर, लाॅस अॅनजालिस येथे झाले आणि चित्रपटानेफ्री टू बी मीसन्मान रोज फिल्मडॅगन, अॅमस्टरडॅम येथे पटकावला.

जगभरातील सहा फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शनासाठीइवनिंग शॅडोनिवड झाली आहे, परंतु मुंबईतील हे प्रदर्शन खरोखरच खास आहे, कारण ते मायभूमीतील प्रेक्षकांसाठी आहे. आम्ही भारतीय एलजीबीटीक्यू समुदायाला आणि त्यांच्या कुटुंबियांना आलिंगन देण्यास उत्सुक आहोत. आमची आशा आहे की भारतीय LGBTQ समुदाय आणि त्यांच्या कुटुंबियांनी आमचा चित्रपट पाहून त्याच्यातील स्वतःच्या मुलाच्या स्वीकृतीचा संदेश समजून घ्यावाअसे मत क्रिएटिव दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते सागर गुप्ता यांनी व्यक्त केले. त्यांनी चित्रपटातील शुभा मुदगल यांनी गायलेल्यासुरमयी शामया गाण्याचे बोल पण लिहिले आहेत.

श्रीधर यांनी दुहेरी धडकी भरवली आहेपारंपरिक विचारसरणीच्या जोडप्याचे त्यांच्या मुलाचे सत्य जाणून घेण्याचे वर्णन करणारा त्यांचा संवदनशील चित्रपटइवनिंग शॅडोहा दक्षिण आशियामधील सर्वांत मोठ्या LGBTQ चित्रपट महोत्सवाच्या  समारोप समारंभाचा आकर्षण बिंदू ठरेल. एक अनोखा सन्मान या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून दिला जाईल. प्रसिद्ध अभनेते अनंत महादेवन ज्यांनी चित्रपटात शिस्तबद्ध वडिलांची भूमिका साकारली आहे त्यांच्या मतेजरी श्रीधर काशिष चे संस्थापक नसते तरीही चित्रपटाची निवड निश्चित झाली असती.”

चित्रपटात वसुधा ही आई ची भूमिका साकारणाऱ्या मोना आंबेगावकर म्हणाल्या की, “मागील वर्षीच्या काशिष मध्येइवनिंग शॅडोचा ट्रेलर दाखविण्यात आला आणि या वर्षी हा समारोपाचा चित्रपट आहे, यापेक्षा दूसरी कुठलीही आनंदाची गोष्ट नाही. आमचे अनेक साथीदार आणि शुभचिंतक हे LGBTQ समुदयातील आहेत जे आम्हांला पूर्णपणे साथ देतात. मी त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. ज्या ज्या गोष्टींना मी समर्थन देते त्या सर्व गोष्टी या चित्रपटातून दर्शविल्या आहेत जसे की प्रेम, छळाचा भय, संरक्षणात्मक वृत्ती, आनंद आणि विजय. ह्या चित्रपटातून माझ्या हृदयाचा नजराणा मी माझ्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांना देऊ इश्चिते.”

थोडे कशीश मुंबई आंतरराष्ट्रीय क्वीयर फिल्म फेस्टिवलबद्दल:

जगभरातील उत्कृष्ठ 5 एलजीबीटी फिल्म महोत्सवांपैकी एक म्हणून मत दिलेले, कशीश मुंबई इंटरनॅशनल क्वीयर फिल्म फेस्टिवल हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे आणि भारतातील एकमेव एलजीबीटी चित्रपट महोत्सव आहे जो मुख्य प्रवाहात रंगभूमीवर आयोजित केला जातो. 2010 मध्ये स्थापित, कशीशचे पाच दिवस तीन ठिकाणी आयोजन केले जाते. भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाची मंजुरी घेऊन आयोजित केलेला हा पहिला भारतीय एलजीबीटीचा महोत्सव आहे. कशीश मुंबई आंतरराष्ट्रीय क्वियर फिल्म फेस्टिव्हल कशीश आर्ट्स फाऊंडेशन द्वारा सादर आणि सोलारिस पिक्चर्स द्वारा आयोजित केले आहे. या वार्षिक चित्रपट महोत्सवाव्यतिरिक्त कशीश फाॅरवर्डभारतातील प्रथम ट्रॅवेलिंग कँपस LGBTQ फिल्म फेस्टिवल, कशीश ग्लोबल जे जगभरात भारतीय LGBTQ चित्रपटांचे प्रदर्शन करते, बेस्ट आॅफ कशीश चित्रपटांचे प्रदर्शन आणि कशीश चलचित्र उत्सव जो प्रादेशिक भाषांमधील LGBTQ चित्रपटांचा महोत्सव आहे.

कशीश 2018 फेस्टिवल थीम:

काशीष मुंबई इंटरनॅशनल क्वीयर फिल्म फेस्टिवलची 9 वी आवृत्ती अभिमान आणि कुटुंब, समाज, लिंग, वांशिकता आणि शरीराच्या प्रकारांची असीम विविधता साजरी करेल. समान हक्क आणि सामाजिक स्वीकृतीसाठीचा लढा हा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविरूद्ध लढा आहे आणि जेव्हा आपण सर्व – LGBTIQ आणि सहयोगीस्वतःला साजरे करण्यास अभिमानाने एकत्र येऊ तेव्हाच समान अधिकार प्राप्त होऊ शकतात.

Share this

One thought on “कशीश 2018 चा, ‘बीटस् पर मिनिट’ या चित्रपटाने शुभारंभ तर ‘इवनिंग शॅडो’ या चित्रपटाने समारोप”

Leave a Reply

Your email address will not be published.